राज्यपाल कोश्यारी यांची राजू शेट्टी यांनी घेतली भेट

Governor - Raju Shetty

मुंबई : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावे या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकर्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.

गेल्या तीन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकार या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून शेतकरी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या दिल्लीच्या सीमारेषेवर हा कायदा रद्द करावा याकरिता देशातील पंजाब , हरियाणा , उत्तरप्रदेश , उत्तराखंड या राज्यातील लाखो शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून ठाणं मांडूण बसले आहेत. देशातील सर्वच राज्यातून या आंदोलनास शेतकर्यांनी पाठिंबा दिला आहे मात्र केंद्र सरकारकडून हे आंदोलन दोन राज्यातील शेतकर्यांचे असल्याचे भासवून जाणीवपुर्वक दुर्लक्षित केले जात आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील ६ लाख ७६ हजार शेतकर्यांचे तीनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देऊन केंद्र सरकारला राज्यातील शेतकर्यांच्या कृषी कायद्याविरोधातील तीव्र भावना कळविण्याचे विनंती करण्यात आली.

यावेळी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकरी भावनांचा आदर राखून सदर निवेदन केंद्र सरकारला तातडीने पाठवून देवू असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे , अर्जुन कोकाटे , राष्ट्र सेवा दलाचे अतुल देशमुख , गोवर्धन दबडे , सचिन शिंदे यांचेसह विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER