शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

Governor Bhagat Singh Koshayri

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि.19) शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महापौर किशोरी पेडणेकर खासदार अरविंद सावंत, उपमहापौर सुहास वाडकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, किसन जाधव, माजी महापौर महादेव देवळेकर, श्रद्धा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या  वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात  राज्यपाल कोश्यारी सहभागी झाले.

यावेळी संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

राज्यपालांचे संगीत कला अकादमीला 25 हजार रु. बक्षिस

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी सुरेल गीतांनी प्रभावित राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी अकादमीला 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER