राज्यपाल धनखड यांनी खासदार मोइत्राना दिले उत्तर, नातेवाईक सोडा ते अधिकारी …

jagdeep dhankhar - mahua moitra - Maharashtra today

कोलकाता : सध्या पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) भाजपाच्याविरोधात हिरहिरीने आघाडी लढवत आहेत. त्यांनी काल (रविवारी) राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांच्यावर आरोप केला की, राज्यपालांनी राजभवनात त्यांच्या चार नाइटवाईकांना ओएसडी नियुक्त केले आहे. यावर राज्यपालांनी त्यांना उत्तर दिले – त्यातील कोणीही माझा नातेवाईक तर सोडा, माझ्या जातीचाही नाही.

महुआ मोइत्रा यांनी ट्विट करून या कथित अधिकाऱ्यांची नावे – ओएसडी अभ्युदय शेखावत, ओएसडी-समन्वय अखिल चौधरी, ओएसडी-प्रशासन रुचि दुबे, ओएसडी-प्रोटोकॉल प्रशांत दीक्षित, ओएसडी-आईटी कौस्तव एस वलिकर आणि नव-नियुक्त ओएसडी किशन धनखड अशी जाहीर केली होती.

जगदीश धनखड यांनी मोईत्राच्या ट्विटला उत्तर दिले – मीडियाने आणि महुआ मोईत्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ओएसडीमधील सहा अधिकारी माझे नाइतवैक आहेत. हे चूक आहे. हे अधिकारी तीन वेगवेगळ्या राज्यातील आणि वेगवेगळ्या जातींचे आहेत, आणि चार तर माझ्या जतीचेही नाहीत. उलट, धनखड यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केला की, सध्या राज्याची कायदा – व्यवस्थेची अतिशय वाईट आहे, त्यावरून जनतेचे लक्ष्य हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेस असे वाद निर्माण करते आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button