राज्यपालांना अर्णबच्या प्रकृती व सुरक्षेची काळजी; गृहमंत्रयांशी फोनवरुन केली चर्चा

Anil Deshmukh & &Governor

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. सध्या अटकेत असलेले अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा स्थितीत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना फोन केला आणि अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची, तसंच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही केली आहे. राज्यपालांनी यापूर्वीही देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अलिबागवरुन तळोजा कारागृहात आणण्यात आलं. तेव्हा अर्णव यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER