राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होळीनिमित्त पारंपरिक वाद्यांवर थिरकले!

Governor Bhagat Singh Koshyari - Maharastra Today

देहरादुन :- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यात होळी आणि धूलिवंदनाचा सण साजरा करण्याबाबत काही निर्बंध घातले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी खास पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. यावेळी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडलं. तसंच फुलांची उधळणही करण्यात आली.

आपला गृहप्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये होल्यारो यांचं निवासस्थानी स्वागत केलं आणि कुमाऊँनी खडी होलीमध्ये सहभाग घेतला, असं ट्विट भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करताना आणि टाळी वाजवून वाद्यांना साथ देताना कोश्यारी दिसून आले. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button