फडणवीस सरकारच्या काळातील ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

Maharashtra Today

मुंबई : राज्यात सध्याच्या परिस्थितीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी हा नवा वाद निर्माण झाला असून आता राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारपुढे (MVA Govt) आणखी एक चिंता उभी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात घेतलेल्या एका निर्णयाला राज्यपालांनी नकार दिला आहे .सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि विशेषज्ञ या दर्जाची एकूण २७० पदांची भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षांसाठी वगळून ही पदे थेट निवड मंडळामार्फत भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी या प्रस्तावास नकार दिला आहे. राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची तातडीनं भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता त्यामधील २,२२६ पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. आता राज्यपालांच्या निर्णयामुळे राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Govt) वाद पेटण्याची शक्यता आहे.

आरोग्य विभागात २७० पदांची भरती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या. त्यावेळी आचारसंहितेच्या काळात यावर काहीच प्रक्रिया झाली नाही. ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर काही काळातच कोरोनाने थैमान घातलं. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यानंतर आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीस आला होता. तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button