७९ वर्षांच्या पवारांना बांधावर उतरावे लागते हे सरकारचे अपयश – पडळकरांची टीका

Sharad Pawar - Gopichand Padalkar

सांगली : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संकटात ७९ वर्षांच्या शरद पवारांना (Sharad Pawar) बांधावर उतरावे लागते हे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अपयश आहे, अशी टीका भाजपाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

पवारांचे कौतुक करताना पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टोमणा मारला म्हणाले – जे कारभारी त्यांनी (पवारांनी) या सरकारमध्ये बसवलेले आहेत, ते अपयशी ठरले आहेत त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागते. शरद पवार सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे.

कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात जिवाची परवा न करता शरद पवार हे बळीराजाच्या भेटीसाठी जात आहेत. तुळजापूरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. काकांब्रा, लोहारा, सास्तूर या गावांचा दौरा केला. कांकाब्रा ते सास्तूरदरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. गाडी पवारांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली.

शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शरद पवार भेटून गेल्यामुळे आपल्याला मदत मिळेल, अशी आशाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. शरद पवार रविवार आणि सोमवार हे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER