‘सरकारे येतात आणि जातात, कोरोनाशी एकत्र लढण्याची गरज; संजय राऊतांचे विरोधकांना आवाहन

Sanjay Raut - Devendra Fadnavis - Maharastra Today
Sanjay Raut - Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना विश्वासात घेऊनच दोन दिवस कडक लॉकडाऊन (Lockdown) ते इतर दिवशी निर्बंध घातले आहे. मात्र आता विरोधक या निर्णयाचा विरोध करत आहेत. कोणालाही लॉकडाऊन करणे आवडणार नाही. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. आपण सत्तेत नसल्याचे विसरुन विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे, सरकार येते आणि जाते, हे ध्यानात ठेवून सरकारसोबत हातात हात घालून कोरोनाशी सामना करावा, असे आवाहन शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना केले. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. तिथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा विचार केला नाही, शेवटी हाय कोर्टने आदेश दिले. हि परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य आणि केंद्राने मिळून याचा सामना करावा. कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. याकडे केंद्राने तात्काळ लक्ष घालून लसीचा पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button