पोलीस बळाचा वापर करून ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचा सरकारचा प्रयत्न; भाजपाचा आरोप

pravin darekar & Uddhav Thackeray

मुंबई : पोलिसांचे बळ वापरून राज्यात ठिकठिकाणी जबरदस्तीने बंद करायला लावला. ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने केविलवाणे प्रयत्न केले, असा आरोप राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिला आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’लाही महाविकास आघाडीने समर्थन दिले. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. पण राज्य सरकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

पोलिसांचे बळ वापरून राज्यात ठिकठिकाणी बंद करत असतानाची अनेक उदारहरणे  समोर आली आहेत. वरळी नाक्यावर पोलीस बंद करायला सांगत होते. रायगडच्या महाड येथे एक पोलीस दंडुका हातात घेऊन बंद करायला सांगत असल्याचा फोटो माझ्याकडे आला आहे. याचा अर्थ बंदला प्रतिसाद मिळत नाही म्हणून पोलिसांचा वापर करून बंद यशस्वी झाला, असे दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे हे चित्र देशात आहे.

पंजाब आणि हरियाणातील काही मूठभर लोक सोडले तर देशातील लोक या कायद्याच्या बाजूने आहेत. त्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनाची किंमत वाढणार आहे, दर्जा वाढणार आहे, मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला खुल्या बाजाराचा उपयोग करत आर्थिक हित साधता येणार आहे, असे दरेकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER