बा.. विठ्ठला महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

CM Uddhav Thackeray - Rashmi Thackeray

सोलापूर : आज आषाढी एकादशी. दरवर्षी या दिवशी पंढरपुरात भक्तीचा गजर असतो. लाखो भाविक चंद्रभागेत स्ऩान करून विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य होतात. यंदा देशावर कोरोनाचे संकट असल्याने इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठलाची वारी रद्द करावी लागली.

मात्र, असे असले तरी काल मुक्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पंढरपुरात दाखल झाले. परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा मुक्यमं6ी ठाकरे व पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झाली.

सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला. पहाटे अडीचच्या सुमारास मुर्तीसंवर्धनासाठी डोक्यावरुन पाण्याने तर पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले. चंदनाचा टिळा लावल्यानंतर देवाला भगरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा झाली. शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर वारक-यांना विठ्ठल-रखुमाईचं मंदीर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मानाचे वारकरी विठ्ठल बडे व त्यांच्या पत्नीनेही विठ्ठलाचे दर्शन घेतले.
विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला.

‘राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ द्या’ अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिराचा गाभारा सुगंधी फुलांनी सजवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही महापूजेला उपस्थित होते. ‘पंढरपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आई, यांच्यासोबत विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. यावेळी फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर मुक्त कर असे साकडे मी विठुरायाच्या चरणी घातले.’ असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन सांगितलं.

त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंग चरणी वंदन केलं. राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, कोरोनायोद्ध्यांचे संरक्षण कर आणि बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे, असं साकडंही त्यांनी घातलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER