सरकार फार काळ टिकणार नाही : रामदास आठवले

कोल्हापूर :- आताच्या सरकारमध्ये जोरात तनातानी सुरू आहे. हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे काहीतरी तथ्य त्यात असावे. तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ दिसत नाही. रोज एकमेकाच्या विरोधात स्टेटमेंट येत आहेत. यामुळे हे सरकार पडणार हे निश्चित, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात केले.

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ कीर्तनाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर उपलब्ध नाही !

भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्यावतीने शिवाजी विद्यापीठ येथे जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाय्यक साधन साहित्य वाटप केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री आठवले यांनी महाराष्ट्र सरकार फार काळ चालणार नाही असे सांगितले.