दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मंत्री जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने दूध विक्रीवर परिणाम झाला. यातून दुधाचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतक-यांना मदत केली जात आहे. दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. दूध संघांकडून दूध खरेदी सुरू असून, दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रविवारी सांगलीत सांगितले.

मंत्री पाटील म्हणाले, शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. शेतक-यांचे प्रश्न निदर्शनास आणणे तसेच त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही चांगलीच बाब आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची आंदोलनाची भूमिका योग्य आहे. कोरोना संसर्गाने उद्भवलेल्या प्रश्नांमुळे दूध दराचे संकट अधिक वाढले. केंद्र सरकारनेही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी राज्य सरकारने मागणी केली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याने दूध उत्पादकांना मदत देणे सुरू केले आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देणा-या दूध संघांची दूध खरेदी सुरू केली आहे. याशिवाय दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER