आघाडी सरकारडून मुस्लिम समाजासाठी गुड न्यूज, मुस्लीम आरक्षणासाठी कायदा करणार!

Nawab Malik

मुंबई : मुस्लिम समाजाला महाविकास लवकरच गुड न्यूज देणार असून, मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार आहेत. कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. यादृष्टीने मुस्लीम आरक्षणाचा कायदा करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदे संमत करणार असून, शैक्षणिक प्रवेश सुरू होण्यापूर्वी हा कायदा करू, असं आश्वासन नवाब मलिक यांनी दिलं आहे. मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. मुस्लीम आरक्षणाबाबत २०१४ प्रमाणे अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रुपांतर करु. उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणाबाबत जे मान्य केलं आहे त्यादृष्टीने राज्यात तातडीने मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आम्ही आरक्षणाबद्दल दोन भागांमध्ये निर्णय केला जाईल, अशी घोषणा केली आहे. उर्वरित आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन आरक्षण देण्यात येईल, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवारांचा पुढाकार; मराठा, धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी