सरकारी व्हेंटिलेटर खासगी दवाखान्यात : संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

Sambhaji Brigade

कोल्हापूर : कोरोना (Corona) काळात महापालिकेकडे 40 व्हेंटिलेटर (Government ventilator) आली होती. त्यापैकी 15 व्हेंटिलेटर सीपीआर दवाखान्यासाठी 8 व्हेंटिलेटर आयसोलेशनसाठी आणि तीन व्हेंटिलेटर राजोपाध्ये नगरातील कोव्हीड सेंटरला देण्यात आली. उर्वरित व्हेंटिलेटर खासगी हॉस्पिटलना देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली आहे. ज्या खासगी हॉस्पिटलना कोणत्याही परवानगी, अटीशिवाय व्हेंटिलेटर देण्यात आली त्यांनी रुग्णांच्या बिलामध्ये व्हेंटिलेटरचे बील अकारुन लाखो रुपयांची लूट केली आहे. यामुळे महापालिकेने संबंधित हॉस्पिटलकडून ही बीले वसूल करुन रुग्णांना परत करावीत , अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) वतीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रुपेश पाटील म्हणाले, महापालिकेकडे एकूण 40 व्हेंटिलेटर होते.त्यापैकी अनेक व्हेंटिलेटर वापरले नाहीत. सरकारी मालमत्ता खासगी व्यक्ती किंवा संस्थांना देण्याचा अधिकार महापालिका प्रशासनास आहे का असा प्रश्न आहे. या प्रश्नावर महापालिकेच्या उपायुक्तांनी आयुक्तांचा तोंडी आदेश असल्याचे कळवले. कोणतीही अट किंवा परवानगीशिवाय महापालिकेने खासगी हॉस्पिटलना व्हेंटिलेटर दिली. खासगी हॉस्पिटलमध्ये पण महापालिकेच्या व्हेंटिलेटरवर उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी तपासली असता एका व्हेंटिलेटरवर दिवसाला 9 हजार रुपयांच्या बीलाची आकारणी केल्याची बाब समोर आली. सरकारी व्हेटिलेटर असताना रुग्णालयाने उपचार घेणारे रुग्ण,त्यांचे नातेवाईक किंवा ऑर्ड याबाबत माहिती दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER