सरकार रेमडेसिवीरच्या ४.५ लाख कुप्या आयात करणार; आज भारतात ७५ हजार कुप्या येणार

Import Of Remdesivir - Maharashtra Today

देशात देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच अनेक राज्यांत ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. तुटवडा दूर करण्यासाठी रेमडेसिवीरच्या ४.५ लाख कुप्यांची आयात करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. यासंदर्भाची माहिती रसायन व खते मंत्रालयाने दिली आहे. ७५ हजार रेमडेसिवीरची (Remdisivier Injection) पहिली खेप आज भारतात येणार आहे. त्याचबरोबर, रेमडेसिवीरची मागणी अनेकपटींनी वाढली आहे.

ही कमतरता दूर करण्यासाठी सरकारने इतर देशांकडून ‘रेमडेसिवीर’ची आयात सुरू केली आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे. शुक्रवारी (आज) ७५ हजार कुप्यांची पहिली खेप भारतात पोहचेल. अँटीव्हायरल औषध संसर्गजन्य रोगाच्या उपचारात वापरले जाते. भारत सरकारच्या मालकीच्या कंपनी एचएलएल लाइफकेअर लिमिटेडने मिस गिलियड सायन्सेस इंक यूएसए आणि इवा फार्मा कंपनीकडून ४ लाख ५० हजार रेमडेसिवीरच्या कुप्या मागवल्या आहेत.

गिलियड सायन्सेस येत्या एक-दोन दिवसांत ७५ हजार ते एक लाख कुप्या पाठवतील अशी अपेक्षा आहे. १५ मेपर्यंत किंवा त्याआधी एक लाख कुप्या पुरवल्या जातील, असे निवेदनात म्हटले आहे. ईव्हीए फार्मा सुरुवातीला १० हजार कुप्यांचा पुरवठा करेल. त्यानंतर १५ दिवसांत जुलैपर्यंत ५० हजार कुप्या उपलब्ध करून दिल्या जातील.

ही बातमी पण वाचा : रायगडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्यावर ९० जणांची तब्येत बिघडली ;   इंजेक्शनचा वापर थांबविण्याचे आदेश   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button