ठाकरे सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत असल्याचा समन्वयकांचा आरोप

Uddhav Thackeray - Maratha Kranti Morcha

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम स्थगिती दिल्याने चांगलेच वादंग पेटले आहे . मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे . यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन कॉल टॅप होत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरेंनी केला.

आमच्या मनात आक्रोश असला, तरीही आम्ही सनदशीर तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमचे फोन टॅप करू नयेत, अशी विनंती राजेंद्र कोंढरे यांनी केली. राज्य सरकारनं मंगळवारी मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध घोषणा केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समन्वयक राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, सचिन आडेकर, हनुमंत मोटे आणि प्राची दुधाने आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER