MPSC बाबत सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा आरक्षणासारखी परिस्थिती होईल – भातखळकर

Atul Bhatkhalkar-Uddhav Thackeray.jpg

मुंबई : सरकारनं एमपीएससीच्या (MPSC) परिक्षांबाबत तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात मराठा आरक्षणासारखी (Maratha reservation) परिस्थिती येईल असा इशारा भाजपा महाराष्ट्र राज्य युनिटचे सरचिटणीस अतूल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

तसेच भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) शाब्दिक हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख म्हणून 100 टक्के अपयशी ठरल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.

एमपीएससीच्या परिक्षा वेळेत होण्याबाबत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.भातखळकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी ना सरकारची इच्छा ना क्षमता असे म्हणत ते कोणाला भेटत नाहीत. हे कंत्राटी पद्धतीनं सत्तेवर आलेलं कंत्राटी सरकार असल्याची टीका भातखळकरांनी केली.

दरम्यान, मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा भेट घेतली आरक्षण व एमपीएससीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंदचा निर्णयदेखील मागे घेण्यात आला आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून 1 महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. याशिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले, महिन्याभरात आम्ही दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन सरकारकडून मिळाल्यामुळे आम्ही तात्पुरता बंद मागे घेत असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER