सरकारने तुझे-माझे करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा- संभाजीराजे

Sambhaji Raje

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली. काही ठोस नियोजन आहे की नाही हे मला सरकारला विचारायचं आहे, असं संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले . तसेच सरकारने तुझं-माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न सोडवावा, असेही ते म्हणाले.

मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता १५ ते २५ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीनं दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर २०१७ ला मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. तेव्हा मोर्च्याला काही तरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं. पण, सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली. काही ठोस नियोजन आहे की नाही हे मला सरकारला विचारायचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER