११ एप्रिलच्या MPSC परीक्षेबाबत सरकारने फेरविचार करावा : नरेंद्र पाटील

MPSC Exam - Narendra Patil

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलू नये, यासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता ११ एप्रिलची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे. मात्र, अद्याप सरकारकडून यासंदर्भात कुठलेही स्पष्टीकरण नाही. त्यामुळे, सगळीकडे संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नेत्यांकडूनही होत आहे. यासंदर्भात माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी ट्विट केले आहे.

कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत MPSCने १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात परीक्षार्थ्यांनी  राज्यभर आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने तातडीने निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील, असे स्पष्ट केले. MPSCची २१ मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ११ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेबद्दल अद्याप सूचना नाही.

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे. आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. ‘लॉकडाऊन’ असताना ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल, तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती, असे ट्विट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button