सरकारला लाज वाटली पाहिजे : अभिनेते प्रकाश राज

Prakash RAj

नवी दिल्ली :- गेल्या कित्येक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर ताण पडत आहे. दुसरीकडे सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात आणखी वाढ केली आहे. महिनाभरात सिलिंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. यात पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली आहे. याच दरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी “सरकारला लाज वाटायला हवी” असे मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

याबाबत प्रकाश राज यांनी ट्विट केले आहे. “गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडरची किंमत २२५ रुपयांनी वाढली आहे. ” असे ट्विट करत सरकारला लाज वाटायला हवी, अशी बोचरी टीका केली. गेल्या तीन महिन्यांत सिलिंडरच्या दरात कशी वाढ झाली, याबाबतची माहिती ट्विटमधून स्पष्ट केले आहे. एलपीजीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील याबाबत ट्विट केले होते. सिलिंडरच्या वाढत्या दरावरून टोला लगावला. “एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा, चूल फुका, खोटी आश्वासने खा” असे ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली.

यापूर्वी ४ व २५ फेब्रुवारी रोजी गॅसचे दर २५ रुपयांनी वाढले. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.देशात पुन्हा विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत गॅसचे दर ७९४ रुपयांवरून वाढून ८१९ रुपये इतके झाले. तर मुंबईत ८१९ रुपये, कोलकात्यात ८४५.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८३५ रुपये झाले आहेत. जानेवारी महिन्यात कंपन्यांनी या दरात कोणतेही बदल केले नाहीत; परंतु फेब्रुवारी महिन्यात तीनदा दर वाढवण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER