नवरात्रोत्सवाबाबत सरकारने नियमावली जाहीर करावी : आशिष शेलार

ashish shelar

मुंबई : नुकताच गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव (Ganeshostav) साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच गणेश मूर्तींबाबतही सरकारने काही नियम लादले होते. त्यामुळे मूर्तिकारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते.

याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नवरात्रोत्सवाबाबत सरकारने नियमावली जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. गणेश मूर्तींची लगबग संपली की मूर्तिकार देवीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मूर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मूर्तिकारांना द्या, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER