
अहमदनगर :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन इशारा दिला आहे. भाजपाचे नेते अण्णा हजारे यांची भेट घेऊन अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी अण्णा आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. रामाचे नाव घेऊन राज्य करायचे आणि प्रभू राम यांचा आदर्श बाजूला सारून दिलेली वचने पाळायची नाहीत, असा या सरकारचा कारभार सुरू आहे, अशी टीका अण्णांनी केली.
अण्णा म्हणालेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी हजारे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनापेक्षा माझ्या मागण्या वेगळ्या असून दिल्लीच्या आंदोलनावर माझे आंदोलन अवलंबून नाही, असा संकेत अण्णांनी दिला. (Anna Hazare On BJP)
कृषिमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारा यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. अण्णांचे हे आंदोलन दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा असल्याचे मानले जात होते. मात्र, ‘अण्णांचे हे आंदोलन दिल्लीतील शेतकरी आंदोलनापेक्षा वेगळे असून त्यांच्या जुन्याच मागण्यांसाठी त्यांचे हे समांतर आंदोलन असेल,’ अशी भूमिका हजारे यांनी स्पष्ट केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला