ठाकरे सरकारचा निर्णय, फडणवीसांची बुलेटप्रूफ गाडी काढली

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता फडणवीस याना दिलेले बुलेटप्रूफ वाहन काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) , प्रसाद लाड यांना तर आता विशेष सुरक्षा नसेल. देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी हिटलिस्टमध्ये टाकले असल्याची चर्चा आहे. या संबंधात त्यांच्या निकटवर्तीयांची काळजी घेतली जात होती. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या भोवतीचे सुरक्षाकवच अभेद्य करण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात शहरी नक्षलवादाबद्दलचे काही निर्णय हे त्यांच्यासाठी आयुष्यभराचे आव्हान ठरल्याचे मानले जाते.

मात्र, काल रात्री उशीरा अचानक त्यांना देण्यात आलेले पायलट वाहन आणि बुलेटप्नुफ गाडी काढून देण्यात आली. नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जात असतो. महाविकास आघाडी सरकारमधील उच्चपदस्थांच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी यासंबंधीचा आढावा घेण्यात येणार होता. त्या बैठकीनंतर हे घडले काय याबद्दल उत्सुकता आहे.

संजय बनसोडे, अस्लम शेख अशा काही मंत्र्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला सामोरे जाणारे प्रसाद लाड ,कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले पण अद्याप भाजपमध्ये न प्रवेशलेले कृपाशंकरसिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात ठाकरे कुटुंबाला देण्यात येणाऱ्या सुरक्षाव्यवस्थेवरून कायम वाद होत होते. महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेणारी यंत्रणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आढावा बैठका घेत असते. ठाकरे कुटुंबातील चार जणांना वाय सुरक्षा कवच अनेक वर्षापासून देण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा झेड करण्यात आली होती. सुमारे एक वर्षापूर्वी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याची सुरक्षा कमी करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णयही बहुचर्चित ठरला होता.

ही बातमी पण वाचा : ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, आज असंख्य गुजराती बांधव शिवबंधनात अडकणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER