मराठा आरक्षणाकडे सरकारने जास्त लक्ष देण्याची गरज – फडणवीस

Devendra Fadnavis

ठाणे : कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यात सरकार पाडण्यापासून ते सारथी संस्थेपर्यंत अनेक मुद्यांवरून भूमिका मांडली.

ठाण्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी करोना व्यतिरिक्त मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर भाष्य केलं. “मराठा आरक्षण हा राजकारणाच्या पलीकडचा भाग आहे. आम्ही जेव्हा आरक्षण दिले, तेव्हा सर्व पक्षांना विश्वासात घेतले होते. मोठी टीम तयार करून आम्ही काम करीत होतो. राज्य सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत. त्याचप्रमाणे सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही,” असं फडणवीस म्हणाले.

राज्यातील सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातून केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले,”हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधानेच पडेल. १२ आमदारांपेक्षा महाराष्ट्राची १२ कोटी जनता आमच्यासाठी महत्वाची आहे. करोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतांकडून वारंवार नव्या कपोलकल्पित कथा रचणे योग्य नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER