सरकार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’; मोदी सरकारवर टीका

PM Modi-Rahul Gandhi

नवी दिल्ली : आज लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आक्रमक झाले. “शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) देशाचा कणाच मोडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत.” अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. “मी बजेटवर बोलणार नाही, केवळ शेतकऱ्यांवर बोलणार. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना श्रद्धांजलीही दिली नाही.

माझ्या भाषणानंतर दोन मिनिटे श्रद्धांजलीसाठी उभा राहीन.” असेही ते म्हणाले. काही वर्षांपूर्वी कुटुंब नियोजनाचा एक नारा होता. तो म्हणजे ‘हम दो, हमारे दो…’ जसा कोरोना दुसऱ्या रूपात येत आहे, तसाच हा नारा आता दुसऱ्या रूपात येत आहे. या देशाला फक्त चार लोक चालवतात. त्यांना संपूर्ण देशात अन्नधान्य, फळ आणि भाजीपाला विकण्याचा अधिकार देण्यात यावा. हा आमच्या सरकारचा पहिला उद्देश आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER