ECGC मध्ये सरकारी नोकरीची संधी

ECGC

नवी दिल्ली : कोरोनामुळे (Corona) देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. आता पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनने (ECGC) प्रोबेशनरी ऑफिसर पदांवर योग्य उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे.

या जागांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. ऑनलाईन अर्ज 01 जानेवारी 2021 पासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 आहे. यासाठी ऑनलाईन परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येईल. या परिक्षेचा निकाल 31 मार्चपर्यंत जाहीर होणार आहे. यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 पर्यंत असावे. आरक्षित नसलेल्या विभागातील उमेदवारांना 700 रुपये आणि आरक्षित उमेदवारांना 125 रुपये फि असणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक तरुणांनी www.ecgc.in या संकेतस्थळावर जावून संपूर्ण माहिती पाहू शकता. या पदासाठी उमेदवारांना 32,795 रुपयांपासून 62,315 रुपयांच्या वेतनश्रेणीनूसार वेतन मिळणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या ५९ पदांसाठी भरती होणार आहे. यातील २५ पदे आरक्षित नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER