नवीन सरकारचे कौतुक करावे असे चांगले काम अद्याप केले नाही – पंकजा मुंडे

मुंबई :- नवीन सरकारचे कौतुक करावे असे चांगले काम अद्याप केले नाही. महाविकास आघाडीचे सरकार जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यात बिझी आहे. अद्याप निर्णय घेत नाही. जर घेतलेला निर्णय आवडला नाही तर रस्त्यावर उतरू. मात्र युती सरकारने घेतलेले शिक्षकबदली, जनतेतून सरपंच निवड, हे सामन्या माणसाच्या हिताचे निर्णय रद्द करू नयेत,’ अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

..तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती! : संजय राऊत

जलयुक्त शिवार, जलसंजाल (वॉटर ग्रीड), जनतेमधून थेट सरपंच निवड, अशा योजना, निर्णयांवर बंदी आणण्याच्या कामातच सरकार सध्या व्यस्त आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. बीड येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात त्या शुक्रवारी बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार केशव आंधळे, आदिनाथराव नवले, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे आदि उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडीच महिन्यांनंतर पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, पाच वर्षं चांगले काम केले. मंत्री म्हणून सत्कार घेत कोठे फिरले नाही. प्रत्येक क्षण जिल्ह्यच्या विकासासाठी दिला. मात्र अभ्यास कितीही चांगला केला तरी गुण देण्याचे अधिकार हे सामान्य मतदारांना असल्यामुळे त्यांनी कौल दिला.

पराभव झाला तरी आपण सातत्याने पक्षाच्या प्रक्रियेत कार्यरत होते. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेतून सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. जिल्ह्यच्या मातीत आक्रमकता आहे. अन्याय सहन न करता संघर्ष करण्याची शक्ती प्रत्येकात आहे. नेत्यांचे विचार आणि भूमिका बदलल्या तरी सामान्य माणूस आपल्या नीतिमत्तेवर ठाम आहे. नवीन सरकारने कौतुक करावे असे अद्याप काम केले नाही. यापूर्वीच्या सरकारच्या योजना बंद करण्यातच सरकार व्यस्त आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.


Web Title : It has not yet done a good job of praising the new government – Pankaja Munde

Maharashtra News : Latest Mumbai Marathi News only on Maharashtra Today