बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठा देण्यासाठी शासनाचा पुढाकार – हसन मुश्रीफ

hassan Mushrif

कोल्हापूर :  महिला बचत गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांना बाजार पेठा मिळवून देण्यात शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सवाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला. यानिमित्त महिला स्वयंसहायत्ता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे विक्री प्रदर्शन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते संपन्न झाला.

महापालिकेतील घरफाळा भ्रष्टाचाराच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप

त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलच्या ग्राऊंडवर तीन दिवसांसाठी आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सव 2020 च्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार व्यक्त करुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात बचत गटाची व्यापक चळवळ निर्माण झाली असून या चळवळीला गती देण्याची शासनाची भुमिका आहे. बचत गटाच्या महिलांना व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. बचत गटाच्या महिलांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना सुत्रबध्द आणि नियोजनबध्द बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते म्हणाले.