धक्कादायक : शासकीय रुग्णालये फायर ऑडिटप्रश्नी उदासीन

Fire Audit In Hospital Issue

कोल्हापूर : भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात शिशुंना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर कोल्हापुरात सीपीआरसह जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील फायर ऑडिटचा ( fire audit issue) विषय चर्चेत आला आहे. कोरोना संकटात सीपीआरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घडलेली आगीची घटना अजून ताजीच आहे. या घटनेची पुनरावृत्ती कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात कोठेही घडू नये, यासाठी प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागेल. धक्कादायक बाब म्हणजे रोज हजारो रुग्णांची ये जा असणाऱ्या सीपीआर, पंचगंगा वगळता जिल्ह्यात अन्य रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले नाही. सीपीआरमध्ये ऑडिट झाले असले तरी त्याअनुषंगाने करावयाची अंमलबजावणी झालेली नाही. भंडारा दुर्घटनेनंतरच यंत्रणेचे डोळे उघडणार का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सन २०१२ पासून महापालिकेच्या अग्निशमन दलाने वारंवार सूचना देऊन फायर ऑडिटकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली. यानंतर सीपीआरने तत्काळ फायर ऑडिट केले. ऑडिटदरम्यान अनेक त्रुटी अग्निशमन शिशू विभाग आहे. येथे आग लागली तर ती विझविण्यासाठी योग्य ती साधनसामग्री नाही. अशीच अवस्था जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत आहे.

शासकीय रुग्णालये ही सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यातही अडचणी येत असल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्तता करण्यासाठी सीपीआरसह उपजिल्हा रुग्णालये यांना निधीची गरज आहे. फायर ऑडिट गांभी्यने घेतले नाही तर भविष्यात भंडारा जिल्हा रुग्णालयासारख्या भीषण घटनेचा धोका जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना देखील आहे. त्यामुळे वेळीच योग्य त्या सुधारणा करण्याची गरज आहे.

रुग्णालयात आवश्यक गोष्टी

  • फायर एक्सटिंग्युजर.
  • प्रत्येक मजल्यावर होज गुंडाळी (पाईप).
  • छतावर विद्युत पंप बसविणे.
  • स्वयंचलित तपासणी यंत्र बसविणे.
  • आपत्कालीन मार्गाची गरज.
  • बंदिस्त इलेक्ट्रॉनिक्स वायरिंग.
  • इमारतीखाली ५० हजार ते २ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बनविणे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER