अर्थसंकल्पात गरीबांसाठी नाही, मात्र भांडवलदार मित्रांना खूप काही : राहुल गांधी

Nirmala Sitharaman-Rahul Gandhi

नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत तिसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी यावर संमिश्र मत मांडले आहे. भाजपा नेत्यांनी अर्थसंकल्पाची वाहवा केली आहे. तर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर अवघ्या दोन ओळीचं ट्विट करून टीका केली आहे. मोदी सरकार देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांना हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात गरीबांसाठी काहीच देण्यात आलेलं नाही. गरीबांच्या हातात रोख रक्कम येण्याची बात सोडाच, पण मोदी सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांना देशाची संपत्ती हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

गरीबांच्या हातात थेट रोख रक्कम देण्याची राहुल गांधी यांनी अनेकदा मागणी केली आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी ही मागणी केली होती. गरीबांच्या हातात पैसा आला तर ते खर्च करतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा राहुल यांचा तर्क आहे. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंद्र सरकारकडून अशाप्रकारची कुठल्याही योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER