कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा – नवनीत राणा

Navneet Rana-Uddhav Thackeray-Sanjay raut

दिल्ली : राज्यात कोरोना (Corona) रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. कंगना रणौत  (Kangana Ranaut) आणि शिवसेनेच्या (Shivsena) वादाबाबत त्या म्हणाल्या – कंगनाने फक्त स्वतःबद्दल बोलावे. बॉलिवूडने तिला सर्व काही दिले आहे. त्यावर तिने आरोप करू नये.

संजय राऊतांचा राजीनामा घ्या

याआधी नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या – संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी मर्यादेत राहावे. मुख्यमंत्र्यांचे राऊत यांना समर्थन आहे असे वाटते.

मुख्यमंत्र्यांचे राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचे समर्थन करतील आणि त्यांचा राऊत यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राणा केली होती.

ही बातमी पण वाचा : निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीला मुख्यमंत्र्यांचे समर्थन? – नवनीत राणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER