सरकारपुढे अर्थव्यवस्था सुधारण्याचे आव्हान!

Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार अर्थसंकल्प सादर करताना नक्की कोणत्या घोषणा करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सुरुवातीला पवार यांनी महिलादिनानिमित्त महिलांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, “८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिलादिन म्हणून साजरा करतो. हे आपणा सर्वांना माहीत आहे. या निमित्ताने मी राज्यातील सर्व माता-भगिनींना, युवती-विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या शुभेच्छा देतो.”

“महाराष्ट्र कधी संकटापुढे झुकला नाही किंवा मागे हटला नाही. याच महाराष्ट्रात सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान झाला आणि मराठी मुलखातील अठरापगड जाती-जमातीच्या एकतेतून रयतेचे राज्य उभे केले. कोरोना महामारीसारख्या संकटातदेखील हा देश उभा आहे. सरकारपुढे अर्थव्यवस्था सुधारण्याचे आव्हान आहे. हे आव्हान पेलवताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ‘जोडुनिया धन उत्तम वेव्हारे’ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत.” असे पवार यांनी भाषणात नमूद केले.

“कोरोनाने सर्वसामान्यांचा व्यवहार वर्षभर ठप्प केला होता. जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्या सामाजिक, मानसिक स्वास्थासाठी ही परिस्थिती फार काळ टिकणे योग्य नाही.” या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेला आवाहन केले.

Check PDF.1-भाषणाची सुरुवात मसूदा

Check PDF.2-भाषणाचा समारोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER