सरकारी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आणि QWERTY की-बोर्डचा जन्म झाला!

Christopher Latham Sholes

लॅपटॉप, कॉम्प्यूटर आणि स्मार्ट फोनच्या कि- बोर्डकडं लक्ष देऊन बघितलं की अक्षरांचा क्रम असा का आहे? हा प्रश्न पडतोच. म्हणजेच A, B, C, D च्या ऐवजी QWERTY फॉर्मेटमध्ये का असतं? कारण माहितीये का?

ख्रिस्तोफरने केला होता अविष्कार

टाइप रायटरचा शोध इंग्लंडच्या हेनरी मिलने लावला होता. हा अविष्कार केल्याचं पेटंटही त्यांनी नावावर करुन घेतलं. पण क्वेरटी किबोर्डचा अविष्कार अमेरिकेत करण्यात आला. ज्यांनी हे शक्य केलं त्यांच नाव होतं ख्रिस्तोफर लाथम शोल्स (Christopher Latham Sholes). शोल्स यांचा जन्म १९ फेब्रुवारी १८१९ ला झाला. त्यांनी १९३३ पर्यंत शिक्षण पुर्ण केलं आणि पुढं कारकूणीच काम सुरु केलं. मोठ्या भावाच्या दैनिकात त्यांना नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी विस्कॉन्सिनच्या साउथपोर्ट टेलिग्राफमध्ये कामाला सुरुवात केली. नंतर त्यांनी स्वतःच साप्ताहिक सुरु केलं. पुढं १८४० साली त्यांनी मॅरी जेन मेक्विनी यांच्यासोबत विवाह केला आणि १८५७ पासून साउथपोर्ट शहरात ते रहायला लागले.

टाइपिंगसाठी बनवली मशिन

१८६६ साली सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकराला. त्यांना लिखाणात होणारा त्रास लक्षात घेवून लिखाण काम अधिक जलद आणि कमी श्रमात व्हावं यासाठी मशिन बनवण्याची मागणी होऊ लागली. बाजारातली ही गरज ओळखून ख्रिस्तोफर यांनी सॅम्यूअल्स डब्ल्यू कंपनीच्या मदतीनं यंत्र बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. १८६७ ला त्यांनी या यंत्राच्या अविष्काराचं पेटंट मिळवलं. यानंतर एका मोठ्या वकिलाने त्याच्याकडे आकडेवारी असणारं टाइपिंग मशिन बनवण्याची विनंती केली ज्यामुळं लिखाणाची गुणवत्ता सुधारेल. ख्रिस्तोफर यांच्या मनात तेव्हा एक उत्कृष्ठ दर्जाचा टाइप रायटर बनवण्याचा विचार आला. पुढं २३ जुन १८६८ ला त्यांना या टाइप रायटरचं पेटंट मिळालं.

अडचणींचा करावा लागला सामना

सुरुवातीला किबोर्डमध्ये काळे आणि पांढरे बटन होते. ० आणि १ च्या उपयोगासाठी कोणतेच बटन नव्हते इंग्रजी O आणि I चा वापर त्याऐवजी करावा लागत असे. सुरुवातीच्या टाइप रायटरमध्ये ABCD अशाच क्रमाने शब्द होते. यात अडचण अशी होती की वेगानं टाइपिंग करायला सुरुवात केली की एकाच ओळीतील शेजारी शेजारील अक्षरं कागदावर उमटायची. शिवाय बटण धातुंचे बनलेले होते. वारंवार वापरामुळं यंत्र गरम व्हायचं. जास्त दिवस मशिन वापरलं तर ती बटनं वितळायला सुरुवात व्हायची. त्यामुळं बटणं जाम होत असत.

म्हणून बनवला QWERTY की-बोर्ड

या समस्येवर उपाय करण्यासाठी ख्रिस्तोफर यांनी किबोर्डचा नवा आराखडा बनवला. या आराखड्यामुळं QWERTY किबोर्ड अस्तित्वात आला. पहिल्या रांगेत चार इंग्रजी स्वरांना स्थान देण्यात आलं तर दुसऱ्या रांगेत शिल्लक उरलेल्या एकमेव स्वराला स्थान देण्यात आलं. यामुळं टायपिंगचा वेग वाढला सोबतच बटनं जाम होणाची डोकेदुखीही संपली.

मानवी समाजाला या शोधानं वेगळी दिशा दिली

१८७३ पर्यंत त्यांनी बनवलेला टायपरायटर प्रचंड प्रसिद्ध झाला. नोकरदार वर्गात खासकरुन याची क्रेझ वाढली. आता गरज होती फक्त वेगात याचं उत्पादन वाढवायची. त्यांनी ‘रेमिंगटन प्रोडक्शन’च्या सहाय्यानं उत्पादन वाढवलं. यानंतर विक्री वाढायला सुरुवात झाली. त्यांनी बनवलेल्या क्वेरटी किबोर्डचं यश त्यांना पाहता आलं नाही. १८९० साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी लावलेल्या या शोधामुळं संगणकापासून स्मार्ट फोनपर्यंत सर्व फोनच्या विकासात या किबोर्डनं मोठी भूमिका निभावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER