कांजूरमार्ग कारशेड डेपो उभारण्यासाठी सरकारची मान्यता!

मुंबई : कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे मेट्रो-3 प्रकल्पाची (Metro 3) कारशेड उभारण्यासाठी राज्य सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे, याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. कारशेडसाठी ही जागा योग्य आहे, असा दावाही केला.

मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तरादरम्यान एकनाथ शिंदे यांनी लेखी स्वरुपात ही माहिती सादर केली. मेट्रो कारशेडसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला अहवाल सरकारला सादर केला आहे. सन २०३१ पर्यंत आरे कारशेडमध्ये ४२ गाड्यांचा समावेश करता येईल. पुढील वाहतुकीसाठी पाच हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. त्यासाठी एक हजारापेक्षा जुनी झाडे तोडावी लागतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मागील विधानसभा निवळणुकीत आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवादांचा विरोध झुगारत कारशेडसाठी आवश्यक असलेली सर्व झाडे तोडली. त्यामुळे आरे आंदोलनाला उधाण आले. तेव्हा शिवसेनेने मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले. महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली.

मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला दिले होते.

कारशेडसाठी नवा पैसा खर्च होणार नाही

कांजूरमार्गच्या जागेसाठी कोणताही नवा पैसा खर्च होणार नाही. मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत दिली आहे. आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्च वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग सरकार योग्यप्रकारे करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER