नवरात्रौत्सवाबाबत सरकारने जाहीर केली गाईडलाईन

- गरबा-दाांडिया नाही!

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव (Navratri), दुर्गापूजा (Durgapuja) आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे.

सार्वजनिक नवरात्री उत्सवात मूर्ती ४ फूट आणि घरगुती २ फुटांपेक्षा मोठी नसावी. मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन करताना नियमावली पाळावी, मंडपात सॅनिटाझयरचा वापर करावा. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा (Social Distancing) नियम पाळून करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा गरबा, दाांडियावर बंदी टाकली आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिमेचा प्रचार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता येणार आहे. मात्र, गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळणे अनिवार्य आहे.

शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवराच्या आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरीच करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

ही बातमी पण वाचा : रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER