कोरोना योध्दयांच्या मागे सरकार हिमालयासारखे : हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : कोणाचाही मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यात या पहिल्या कोरोना योध्दाचा (Corona Warriors) मृत्यू झाला आहे. कोरोना योद्ध्यांच्या वारसांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार हिमालयासारखे उभे आहे. समाजानेही अशा कुटुंबीयांना मानसिक आधार द्यावा. कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम तातडीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी दिली.

सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाने ३ ऑगस्टला मृत्यू झाला. या अनुषंगाने संबंधीत मृताच्या वारसास विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य शासनास १२ ऑगस्टला प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी देऊन संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मृत ग्रामविकास अधिकारी यांची पत्नी श्रीमती रंजना आम्ले यांना विमा कवच रक्कम स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER