गोस्वामी यांचा भाजपाशी संबंध, म्हणून फडणवीसांनी प्रकरण दाबले; सचिन सावंतांचा आरोप

Sachin Sawant-Fadnavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण दाबले; कारण आरोपी भाजपाशी संबंधित आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कथित जमीन व्यवहार प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सोमय्यांवर जोरदार टीका केली आहे. (Sachin Sawant On Kirit Somaiya Allegations)

अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले; कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्रद्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे.’ असेही सचिन सावंत म्हणाले.

किरीट सोमय्यांचे आरोप

  • २ कोटी ५५ लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका ९०० कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी ३४५ कोटी दिले. दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्रं माझ्याजवळ आहेत. याबाबत मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
  • अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात जमिनीचे ३० व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या ४० जमीन व्यवहारांपैकी तब्बल ३० नाईक कुटुंबासोबत.
  • रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशिप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचे लिहिले आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजले पाहिजे. (Sachin Sawant On Kirit Somaiya Allegations)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER