गोरिला ‘शांगो’ची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Gorilla 'Shango' corona report negative

मियामी :- येथील दाडे प्राणीसंग्रहालयात शांगो (३१) आणि आणि त्याचा लहान भाऊ बर्नी हे दोन पूर्ण वाढ झालेले गोरिला एकाच आवारात राहतात. त्यांच्यात अचानक भांडण झाले. १९६ किलो वजन असलेल्या शांगोला बर्नीने गंभीर जखमी केले. जखमी शांगोची पूर्ण तपासणी करावी लागली. एवढ्या प्रचंड रुग्णाची तपासणी ही बातमी ठरली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी की – शांगो आणि बर्नी हे दोघे एकाच आवारात राहत होते. शांतपणे एकमेकांपासून दूर रहायचे. पण अचानक त्यांचे भांडण झाले. हाणामारीत शांगो खूप जखमी झाला. बर्नीने त्याचे लचके तोडले होते.

शांगोला फ्लोरिडा प्रांतातील लॅबमध्ये चाचणीसाठी दाखल करण्यात आले. भूल देऊन त्याचा एक्स-रे काढण्यात आला. अल्ट्रासाउंड, टीबी आणि सर्वांत महत्वाची कोविड-१९ची चाचणी देखील करण्यात आली. सुदैवानं कोविडची चाचणी निगेटिव्ह आली आहे. झू मियमीने आपल्या फेसबुकवरुन याबाबत माहिती दिली आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर शांगोला पुन्हा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले असून निरिक्षणाखाली ठेवले आहे. आता बर्नीला दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER