नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव

Nagpur Gorewada

नागपूर :- नागपुरातील बहुप्रतीक्षेत असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे काम पूर्ण झाले असून, २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ते जनतेसाठी खुले केले जाणार आहे. या प्राणिसंग्रहालयाचे  नामकरण आता ‘बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. मंगळवारी मुंबईत ही घोषणा झाली. याबाबतचा नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचा नागपुरात (Nagpur) विरोध केला गेला आहे.

नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारीत असलेल्या या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे.

दरम्यान, विदर्भवादी संघटना ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’ने याचा विरोध केला आहे. आज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या अध्यादेशाची होळी करून आपला विरोध दर्शवला. तर दुसरीकडे या प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ करण्याच्या विरोधात लोकांचे मत जाणून घेण्यासाठी मोहीम उघडली  गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER