गोरखपूर एक्स्प्रेस रवाना; पहाटे डबा घसरला होता

Gorakhpur expess

मुंबई : नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे ३.३० वाजता मुबंईहून गोरखपूरला जाणाऱ्या ‘अंत्‍योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेस’चा डबा रुळावरून घसरला. मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. घसरलेला डबा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून साधारण ९.३० च्या सुमारास एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.


नाशिक : मुंबई – नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे ३.३० वाजता मुबंईहून गोरखपूरला जाणाऱ्या ‘अंत्‍योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेस’चा डबा रुळावरून घसरला. मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. घसरलेला डबा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून साधारण ९.३० च्या सुमारास एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा इंजिनामागचा डबा कसारा घाटातील पुलावर रुळावरून घसरला.

मोठा आवाज झाल्याने चालकाने गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ९.३० च्या सुमारास घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर एक्स्प्रेस विशेष ट्रेन म्हणून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळी आणि इगतपुरी स्थानकात रेल्वेतर्फे प्रवाशांना नास्ता आणि चहा देण्यात आला.