…गावागावात फिरणं मुश्कील होईल; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई :-  राज्याच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात आंदोलन केले .

धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनेशी हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणं मुश्कील होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असं वाटत असेल, पण आम्ही मोडीत काढू असे पडळकर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात काय दिवे लावले? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल   

हे सरकार झोपलं आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचं श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागं करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठीमागे १६ मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता तो मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखलं. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखलं. मी सरकारचा निषेध करतो, असे पडळकर यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : …नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील ; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला टोला

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही. तत्कालीन फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने एक हजार कोटींपैकी पाचशे कोटींची तरतूद केली होती. त्यातला एक रुपयाही धनगर समाजाला या सरकारने दिलेला नाही. विरोधक असताना हीच लोक नागपुरात डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडं, हातात काठी घेऊन आंदोलन करताना दिसली. आता सत्तेत असताना हे धनगरांचा तिरस्कार करत आहेत, असा आरोप पडळकरांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER