गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ त्यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी : मुख्यमंत्री

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे .

‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे. त्यामुळे त्यांनी जंगलाचा राजा असल्यासारखं राहिलं पाहिजे. त्यांना थेट बारामतीतून निवडणुकीत उतरवण्याचा आमचा विचार आहे. याबाबत आम्ही पक्षाकडेही बोलू,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून तिकीट देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी चुरशीची लढत रंगणार आहे.

ही बातमी पण वाचा : वंचित’चे गोपीचंद पडळकर यांची घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश 

गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच भाजप त्यांना बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत .

दरम्यान वंचित आघाडीतून बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली . भाजपप्रति कृतज्ञता व्यक्त करत ते म्हणले की , “भाजपात पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. २०१४ पूर्वी या राज्याची परिस्थिती खुप वाईट होती. कोणी वाली भेटेल की नाही, असं वाटत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासाचं काम करत आहे. तर चंद्रकांत पाटील तळागाळात काम करतं आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम केलं. महाड ते मुंबई रॅली काढली. आता सरकारने धनगर समाजाच्या पाठिशी उभं राहावं,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे .