… आतातरी आम्हाला आरक्षण द्या : गोपीचंद पडळकर

dhangar arakshan

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पाठोपाठ धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservatio) मुद्दा चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) सक्रिय झले आहेत .

आजवर तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदान मोहीम सुरु केली आहे.

धनगर समाजाचे फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदानाची मोहीम हाती घेतली आहे. पडळकर यांच्या आवाहनानंतर या मोहिमेत धनगर तरुणांनी आत्तापर्यंत पाच हजार रक्ताच्या पिशव्या जमा आत्तापर्यंत पाच हजार रक्ताच्या पिशव्या जमा केल्याची माहिती आहे .

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एका कार्यक्रमात आले असताना त्यांनी समाजातील तरुणांना आवाहन केले. सध्याच्या कोरोनाच्या काळात या रक्ताची गरज गोरगरीब रुग्णांना असून त्यांच्यासाठी या रक्ताचा उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले .

धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.

ही बातमी पण वाचा :मराठा समाज एमपीएससी परीक्षांवरून आक्रमक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER