
पंढरपूर : जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन राष्ट्रवादी आणि पडळकर आमने-सामने आले होते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे .
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेनंतर गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. त्यांनी तर आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुखऱ्या बाजूवर बोट ठेवले आहे.
२०१९ मध्ये अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. हाच मुद्दा पकडत पडळकर यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. ते पंढरपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.
लोकसभेच्या निवडणुकीला पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून पडले तेव्हा तुमची लायकी नव्हती का?, असा बोचरा सवाल पडळकर यांनी अजित पवार यांना विचारला आहे. अजित पवार यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेची या प्रश्नाला पार्श्वभूमी आहे. बारामतीच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणारांची इतकी का दखल घेतली जातेय?, असा सवाल याआधी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला