मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्याला पवारच जबाबदार; पडळकरांचा आरोप

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द होण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं नाही, असा आरोप करत या अन्यायाविरोधात आता बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला.

गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही-9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला. ते म्हणाले, या सरकारला कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे नाही. ज्या समाजाला आरक्षण मिळाले आहे तेही घालवायचे आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार ही भूमिका घेत आहे. मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी केली जात आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी पवारांची मानसिकता नव्हती. यावरून त्यांची भूमिका समजून येते, असं पडळकर म्हणाले.

मराठा, ओबीसी आणि पदोन्नती या सर्व आरक्षणाला पवारच सर्वस्वी जबाबदार आहेत. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै-पाव्हण्यांची काळजी आहे. हे सरकार बहुजन समाजाला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास हे सरकारच जबाबदार आहे. या सरकारने अजूनही मागासवर्गीय आयोगाची स्थापना केलेली नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत माहिती देत नाही, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं. आम्ही तर बोललो नाही. महाराष्ट्र भाजप असो की केंद्र सरकार असो कुणीही हा आरोप केला नाही. हे वकिलाने कोर्टात स्पष्ट केले. त्यामुळे सरकारची मानसिकता काय होती आणि आरक्षण कसं गेलं हे उघड झालं, असेही पडळकर म्हणाले.

मराठा आरक्षणापाठोपाठ पदोन्नतीतील आरक्षणाचेही हेच झाले. या उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. मुळात अजित पवार हे या समितीचे अध्यक्ष होऊच कसे शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पवार अध्यक्ष असल्याने या समितीत बाकीचे कुणीही बोलू शकत नाही. काँग्रसेला तर या समितीत कोणीही विचारत नाही, हे सांगायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button