‘अहिल्यादेवींची तुलना ममताशी करणारा हुजऱ्या ‘मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच…

gopichand padalkar - Uddhav Thackeray - Rashmi Thackeray - Sanjay raut - Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगालच्या (West Bengal election) निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचं कौतुक करताना सामना अग्रलेखाचे (Saamana Editorial) संपादक आणि शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ९ मे रोजीच्या सामना ‘रोखठोक’मध्ये केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. राऊत यांनी ममता बॅनर्जींची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याने धनगर समाजासह अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा समाजातून निषेध करण्यात येत आहे.

याच मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी देखील संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. किंबहुना उद्या हे भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच… वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा!’ असा सल्ला देखील सामनाच्या मुख्य संपादिका व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटलंय की, आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा आपल्या मुखपत्रातील लेख वाचला. ज्यापद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button