सत्तेसाठी लाचार काँग्रेसचे मंत्रीसुद्धा लांडग्यांच्या झुंडीत सामील; पडळकरांचा घणाघात

मुंबई : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या ७ मेच्या शासन निर्णयावर (जीआर) गुरुवारी दिलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) शुक्रवारी उठविली. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीबाबत जारी केलेला ७ मे रोजीचा जीआर रद्द करावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेच्या सुनावणीवेळी सरकारचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने पुढील सुनावणी २४ मे रोजी होईल असे स्पष्ट केले आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसह काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावानं मत मागणाऱ्याचं खरं रूप समोर आलं आहे. बहुजनांनो जागे व्हा, बहुजनांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी लाचार काँग्रेसचे मंत्रीसुद्धा या लांडग्यांच्या झुंडीत सामील आहेत, असे म्हणत पडळकर यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांवर निशाणा साधला.

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button