… तो माईचा लाल अवताडेंच्या रुपाने मिळाला; पडळकरांचा अजित पवारांना टोमणा

Gopichand Padalkar scolds Ajit Pawar

पंढरपूर पोटनिवडणुकीत (Pandharpur by-election) अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले होते, राज्यातील ४ पक्षांपैकी ३ पक्ष ‘आम्ही’ एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपाचे समाधान अवताडे विजयी झालेत. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी टोमणा मारला – तो माईचा लाल समाधान अवताडेंच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला !

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेते भारतनाना भालके यांच्या निधनामुळे विधानसभेची पोटनिवडणूक झाली. सहानुभूतीची लाट असल्यामुळे भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके निवडून येतील असा कयास सत्ताधारी महाविकासआघाडीने बांधला. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या भगीरथ भालके यांच्या पाठिशी लावली. मात्र, मतदारांनी कौल दिला तो भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या बाजूने!

निम्म मंत्रिमंडळ ठाण मांडून होत

अजित पेपरांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणालेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा दावा होता की, आम्ही ५० ते ८० हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहोत. अजित पेअर म्हणाले होते – ४ पक्षांपैकी ३ पक्ष आम्ही एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे आविर्भावात वागत होते की आम्ही तिघं एकत्र आहोत, त्यामुळे जे आम्ही म्हणू तेच होईल. विश्वासघाताने सत्तेत येता येते, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

देगलूरसाठी शिवसेनेच्या माजी आमदाराचा इशारा!

दरम्यान, नांदेड-देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. पंढरपूरचे हादरे नांदेडपर्यंत बसले आहेत. तिथल्या शिवसेनेच्या माजी आमदारांनी सांगितले आहे की मला तिकीट दिले नाही तर मी भाजपामध्ये जाणार, असे पडळकर ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button