अन्यथा मुंबईत उग्र आंदोलन; पडळकरांचा इशारा

पुणे :- एमपीएससीच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रं द्या, अन्यथा मुंबईत येऊन उग्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला आहे. जूनमध्ये झालेल्या परीक्षेचे नियुक्तीपत्रं देण्याने कोरोना नियमांचा फज्जा कसा उडेल? असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला .

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडीत काढत आहे. परवाही पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढले. आजही काही ठरावीक विद्यार्थी नियुक्तीपत्रं मिळावं य मागणीसाठी आंदोलन करत होते. पण कोरोनाचं (Corona) कारण देऊन या विद्यार्थ्यांवर दबाव वाढवण्यात आला, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

केवळ 413 विद्यार्थांना नियुक्तीपत्रं द्यायचं आहे. त्यासाठी कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना केवळ नियुक्तीपत्रं देण्यात येत आहे. नियुक्तीपत्रं दिल्याने कोरोना नियमांचा असा कोणता फज्जा उडणार आहे?, असा सवालही त्यांनी केला.

जे विद्यार्थी अधिकारी म्हणून एमपीएससीमध्ये सिलेक्ट झाली आहेत. त्यांना नियुक्तीपत्रं द्यावं, नाहीतर आम्ही मुंबईत आंदोलन करू, असा इशारा देतानाच आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊच देऊ नये, परीक्षा जूनमध्ये झाली. नियुक्ती पत्रं अजून दिली नाहीत. सरकार नऊ महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्तीपत्रं दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील? असा सवाल त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : विश्वासघाताने आलेले सरकार विद्यार्थ्यांशी विश्वासघात करतेय – गोपीचंद पडळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER