‘काका-पुतण्या सत्तेत येताच धनगरांवर अन्याय होतो’ : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar on Sharad Pawar and Ajit Pawar

अहमदनगर : ‘जेव्हा जेव्हा राज्यातील सत्ता काका-पुतण्यांकडे जाते, तेव्हा धनगर समाजाकडे जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. आम्ही आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊ. वेळीच जागे व्हा, अन्यथा धनगर समाजाने मुंबईला घेराव घातला, तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.’ अशी टीका धनगर समाजाचे (Dhangar Community) नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला.

पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता त्यांच्यावर आणि राज्य सरकारवर टीका केली. धनगर आरक्षणासाठी आणि इतर मागण्यांसाठी समाजातील तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

पडळकर म्हणाले की, “आदिवासींनाही समान सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. जेव्हा काका-पुतण्याच्या हातात सत्ता येते, तेव्हा धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय होतो. हा सगळा काळाबाजार आहे. त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जाते. मेंढपाळांना देय असलेली रक्कम दोन वर्षांपासून देण्यात आलेली नाही. राजकीय विरोध केल्याशिवाय राज्यकर्त्यांना जाग येणार नाही. धनगर समाज आपल्या हक्कांसाठी मुंबईला वेढा देईल, तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल.”

“अहिल्यादेवी होळकर यांनी बर्‍याच अडचणींवर मात करून राज्य कारभार केले. त्यांनी राज्य कसे चालविले, याचा अभ्यास करून राजकर्त्यांची सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. मात्र, आता राज्यातील २५० घराण्यांना पोसण्याचे काम सुरू आहे. याद राखा आता बहुजन समाज जागा झाला आहे. आपले हक्क मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अहिल्यादेवींची जयंती साजरी करणाऱ्या युवकांनी आज हा संकल्प केला आहे. आमचे हक्क आम्हाला मिळणार नसतील तर ते हिरावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही.” असा इशारा पडळकर यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button